कामगार नेते मा.आ जयप्रकाश छाजेड एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर. Msrtc news Maharashtra

एस.टी. वर्कर्स काँग्रेस पाटोदा आगाराची कार्यकारिणी जाहीर 

बीड 

कामगार नेते मा. आ. जयप्रकाशजी छाजेड महाराष्ट्र एस.टी. काँग्रेस संघटनेच्या विविध विभाग व आगारांच्या कार्यकारिण्या जाहीर होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड विभागातील पाटोदा आगाराची कार्यकारिणी अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात जाहीर करण्यात आली.

या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश चवरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीड विभागीय जिल्हाध्यक्ष सुदाम खाडे, बीड जिल्हा विभागीय सचिव श्रीकांत येडे आणि राज्य सोशल मीडिया प्रमुख भारत सुरवसे यांनी उपस्थिती दर्शवली.

नवीन कार्यकारिणी जाहीर

या कार्यकारिणीसाठी विभागीय पदाधिकारी तसेच आगार पातळीवरील सदस्यांनी एकमताने पुढील सदस्यांची निवड केली:

  • अध्यक्ष – शेख शाहफैज
  • सचिव – रवींद्र नाईकनवरे
  • सहसचिव – रंजित राऊत, शरद चौरे
  • उपाध्यक्ष – रामदास गायकवाड
  • कोशाध्यक्ष – अमृत काळे, बाळू डफळ
  • कोषाउपाध्यक्ष – खोटे चालक
  • प्रसिद्धी प्रमुख – राजेंद्र काशीद
  • कार्यकारिणी सदस्य – रसूल शेख, दिलीप पाचणकर

सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व कर्मचारी

सत्कार समारंभास पाटोदा आगारातील एस.टी. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये संतोष शिंदे, रतन वंजारे, दादा नाईकवाडे, वसंत मडावी, सूर्यकांत पारखे, गजानन चौरे, पोपट व्हरकटे, बाळकृष्ण थिटे, रावसाहेब शिंदे, लक्ष्मीकांत बडगे, संजय पवार, रमेश सानप, त्रिंबक शिंदे, अस्दुल्ला खान, युवराज चौदार यांचा समावेश होता.

या निवडीनंतर नव्या कार्यकारिणीने संघटनेच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment