created by khushi 10 march
नमस्कार मित्रांनो, EPFO account holders update कर्मचारी खातेधारकांसाठी खुशखबर!आता विना कागदपत्र प्रोफाइल अपडेट होणार.आता EPF सदस्य त्यांच्या आधार लिंक्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) शी संबंधित वैयक्तिक माहिती कोणतीही कागदपत्रे अपलोड न करता अपडेट करू शकतात, यापूर्वी, सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी नियोक्त्याकडून मंजुरी घ्यावी लागत होती, ज्यासाठी 28 दिवस लागतात.
EPFO account holders updates,
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदार आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने प्रोफाइल अपडेटचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, ईपीएफ सदस्य आता कोणतेही दस्तऐवज अपलोड न करता त्यांचे आधार लिंक्ड यूएएन अपडेट करू शकतात.EPFO account holders update
जर UAN आधारशी जोडलेले असेल, तर EPF सदस्य त्यांचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचे किंवा आईचे नाव, वैवाहिक स्थिती आणि इतर वैयक्तिक माहिती कोणतीही कागदपत्रे अपलोड न करता अपडेट करू शकतात. 6 कोटींहून अधिक सदस्यांना याचा फायदा होणार आहे.EPFO account holders update
पूर्वी संपूर्ण प्रक्रिया कशी चालायची?
- यापूर्वी, EPFO सदस्यांना त्यांचे प्रोफाइल अपडेट करण्यासाठी त्यांच्या नियोक्त्याकडून मंजुरी घ्यावी लागत होती, ज्यामुळे 28 दिवसांपर्यंत विलंब होत होता. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नियोक्त्यांद्वारे EPFO ला प्राप्त झालेल्या एकूण 8 लाख सुधारणा विनंत्यांपैकी, सुमारे 45 टक्के आता नियोक्ता किंवा EPFO च्याt मंजुरीशिवाय सदस्य स्वतः मंजूर करू शकतात.EPFO account holders update
- 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी UAN जारी केले असल्यास, प्रोफाइलमधील कोणत्याही अपडेटसाठी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक असेल.
- लक्षात घ्या की सदस्यांनी त्यांच्या EPF खात्यात कोणतेही अपडेट किंवा पैसे काढण्यासाठी त्यांचे आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे. EPF तपशील आणि आधारमध्ये काही समस्या असल्यास, मंजुरीला विलंब होऊ शकतो.EPFO account holders update
EPF प्रोफाइल: कसे अपडेट करावे?
- EPF च्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in च्या पोर्टलला भेट द्या.
- UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा सारखे तपशील भरून सदस्य पोर्टलवर लॉग इन करा.
- यानंतर, मेनूवर जा आणि वर दिलेल्या ‘मॅनेज’ पर्यायावर क्लिक करा.
- ‘Modify Basic Details’ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- आता शेवटी ‘ट्रॅक रिक्वेस्ट’ पर्याय वापरून प्रोफाइल अपडेट प्रक्रियेचा मागोवा घ्या.EPFO account holders update